BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या शुल्लक कारणावरून वीटभट्टी मालकाने एका मजुरास बेदम मारहाण करीत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. ही संतापजनक घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुनील अनिल पवळे (वय 27, रा. जांबे. मूळ रा. उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वीटभट्टी मालक संदीप पवार (रा. जांबे, मुळशी) याच्यावर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील हे आरोपी संदीप याच्या वीटभट्टीवर मजुरी काम करतात. बुधवारी दुपारी काम आटोपून ते आई , वडील, आजी,आजोबा असे चौघेजण गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या संदिपने त्यांना कामाला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावर सुनील यांनी ‘आत्ताच जेवण केले आहे, थोडे बसतो आणि मग कामाला सुरुवात करतो’ असे सांगितले. सुनील यांनी दिलेल्या या उत्तरामुळे चिडलेल्या संदीप याने ‘तुम्हाला माज आला आहे’ असे बोलून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच आरोपीने त्याच्या पत्नीला मानवी विष्ठा आणण्यास भाग पाडले. पत्नीने विष्ठा आणल्यानंतर आरोपीने सुनील यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like