Hinjawadi : भरदिवसा घरफोडी करून हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – लॉक तोडून फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 18) बावधन येथे दुपारी बारा ते पाच या कालावधीत घडली.

याप्रकरणी स्वाती युधिष्ठिर सिंग (वय 29, रा. डॅपोडील अपार्टमेंट, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती आणि त्यांचे पती कामानिमित्त सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बाहेर गेले. त्यांचा फ्लॅट लॉक लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी ते तोडले. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण आठ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला.

स्वाती दुपारी पाचच्या सुमारास घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी गुन्हा नोंदवला असून हिंजवडी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.