Hinjawadi : दुकानाचे शटर उचकटून ड्रेस मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून दुकानात ठेवलेले 64 हजार रुपये किमतीचे ड्रेस मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना पवार मार्केट ताथवडे येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

अनिल नारायण वाडेकर (वय 45, रा. इशा जिनीस सोसायटी, ताथवडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल यांचे ताथवडे मधील पवार मार्केट येथे मुद्रा ट्रेलर अँड रेडिमेडस हे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अनिल यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 64 हजार रुपयांचे ड्रेस मटेरियल चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.