Hinjawadi : घरफोडी करून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बावधन येथील रामनगर परिसरात बंद घराचे कुलुप तोडून घरातील चार लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊच्या सुमारास घडली.

गिरीश वसंत वरदडकर (वय 58, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीश हे कामानिमित्त सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने, घड्याळ व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.