HB_TOPHP_A_

Hinjawadi : बंगल्याचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिने लंपास

0 64

एमपीसी न्यूज – कामानिमित्त घरातील सर्वजण अमेरिकेला गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी सातच्या सुमारास बावधन येथे उघडकीस आली.

HB_POST_INPOST_R_A

प्रवीण श्रीपाद भालेराव (वय 55, रा. लॉ कॉलेज रोड, डेक्कन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे श्रीधर रामचंद्र देशपांडे (वय 65) यांचा चैतन्य सोसायटी बावधन येथे संचित बंगला आहे. देशपांडे कुटुंबीय कामानिमित्त अमेरिकेला गेले आहेत. दरम्यान त्यांचा बंगला कुलूप लावून बंद होता. मंगळवारी (दि. 12) सायंकाळी सात ते बुधवारी (दि. 13) सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाला असलेली ग्रॅनाईटची चौकट तोडली. त्यानंतर दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून त्यावाटे आतमध्ये प्रवेश केला. बेडरूम मधील लाकडी कपाटाच्या लॉकरमधून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 54 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: