Hinjawadi : घरफोडी करून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी मारुंजी येथे घडली.

गोविंद शहाजी चव्हाण (वय 35, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान फिर्यादी गोविंद यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.