Hinjawadi : बिअर शॉपीत 60 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज- चोरट्याने वाईन्स शॉपीचे शटर उचकटून 60 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना बावधन येथील एलोरा वाईन्स दुकानात उघडकीस आली. तसेच परिसरात दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणी बुधवारी (दि. 17) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी दुकानाचे मालक शाम ठाकूरदास जगवाणी (वय 39, रा.कोरेगाव पार्क, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगवाणी यांचे बावधन परिसरात एलोरा वाईन्स नावाचे मद्यविक्रीचे दुकान आहे. 13 एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दरम्यान चोरटयांनी रात्रीतून दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. काउंटर टेबलच्या ड्रॉवरमधील 60 हजार रुपयांची रक्कम चोरून पोबारा केला. 14 एप्रिलला पहाटे हा प्रकार उघडकीस आला. तसेच दुकानासमोर असणाऱ्या सुलोचना कारंजावणे यांच्या घरात व झिनिया सोसायटी येथील पीसीपीएल या ट्रान्सपोर्ट कार्यालयातही चोरीचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक आनंद पगारे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.