Hinjawadi : पाच सीट घेण्यास नकार दिल्याने कॅब चालकाला मारहाण; तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाच सीट घेण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून एका कॅब चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर 2019 रोजी हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. 27) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ अशोक काकडे (वय 27, रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काकडे हे कॅब चालक आहेत. 28 डिसेंबर रोजी आरोपींनी त्यांची कॅब बुक केली. त्यानुसार काकडे कॅब घेऊन हिंजवडी येथील मेगा पोलीस सोसायटी समोर आले. त्यावेळी पाचजण त्यांच्या कॅबमध्ये बसू लागल्याने काकडे यांनी विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये काकडे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.