Hinjawadi : कार-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने रिक्षाला समोरच्या बाजूने धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेआठच्या सुमारास सुसगाव येथे नांदे रोडवर घडली.

मोहिनुद्दिन मेहताब शेख (वय 40, रा. हडपसर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 14 / सी एस 4022 या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी शेख त्यांची रिक्षा (एम एच 12 / एन डब्ल्यू 2364) घेऊन सुसगाव येथील नांदे रोडने जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अल्टो कारने (एम एच 14 / सी एस 4022) त्यांच्या रिक्षाला समोरच्या बाजूने धडक दिली. यामध्ये शेख यांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.