Hinjawadi : मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी; सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या डिव्हायडरला धडकून कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी हिंजवडी फेज तीन येथे घडली.

पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास एम एच 14 / एच क्यू 2687 ही कार फेज तीन येथून जात होती. फेज तीनमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्ता अरुंद आहे. मेट्रोकडून रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर लावण्यात आले आहेत. कार मेट्रोच्या डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली.

कारमध्ये चालक एकटेच होते. चालकाला किरकोळ इजा झाली आहे. पलटी झालेली कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटना घडल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.