Hinjawadi : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीच्या प्रियकराविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज –  प्रेयसीच्या लग्नानंतरही प्रेयसीसोबत प्रेम संबंध ठेऊन तिच्या पतीचा मानसिक छळ करत त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी प्रियकरा विरोधात हिंजवडी (Hinjawadi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत मारुंजी येथे घडला आहे.

अजिंक्य शिवाजी घुले (रा. बीड) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिचे लग्न झाले तरी त्याने ते पुढे तसेच चालू ठेवले, तो तिला भेटायला जात असे यावरून प्रेयसीच्या पतीने त्याला जाब विचारला असता आरोपीने प्रेयसीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.

Pune Crime : पुण्यात पोलिसांच्या दोन कारवायांमध्ये पावणे दोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

त्यानंतर पतीने पत्नीला घेऊन थेट मारुंजी गाठले व तेथे संसार थाटला. मात्र आरोपी हा तेथेही येऊ लागला. आरोपी व प्रेयसीच्या पतीसोबत भांडणे झाली. यावेळी आरोपीने जे करायच ते कर एक दिवस तुझा काटा काढतो, तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी पुन्हा धमकी (Hinjawadi) दिली.

यातून मानसिकरित्या खच्चीकरण झाल्याने प्रेयसीच्या पतीनेच 17 सप्टेंबर रोजी मारूंजी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढिल तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.