BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : सुट्टे मागण्याच्या बहाण्याने काउंटरमधून वीस हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – पाचशे रुपयांचे सुट्टे मागण्याच्या बहाण्याने दोन जणांनी मिळून किराणा दुकानाच्या कॅश काउंटरमधून 20 हजार रुपये काढून घेतले. ही घटना गुरुवारी (दि. 15) सकाळी नऊच्या सुमारास उत्तरनगर बावधन खुर्द येथे घडली.

सीतादेवी चंपालाल प्रजापती (वय 35, रा. उत्तरनगर, बावधन खुर्द) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतादेवी यांचे उत्तरनगर येथे राकेश सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्या दुकानात दोन अज्ञात इसम आले. त्यांनी सीतादेवी यांच्याकडे पाचशे रुपयांचे सुट्टे पैसे मागितले. सुट्टे पैसे देत असताना नजर चुकवून दोघांनी दुकानाच्या कॅश काउंटरमधून 20 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.