BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास

0 94
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- दुचाकीस्वार चोरटयांनी पादचारी महिलेचे 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. रविवारी (दि. 14) रात्री साडेअकराच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला या रविवारी रात्री बावधन येथील सुमती हाईट्स सोसायटीसमोरून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 62 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पगारे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.