Hinjawadi : हिंजवडीतील वाहतुकीत प्रायोगिक तत्वावर बदल

एमपीसी न्यूज – हिंजवडी मधील इंडियन ऑईल पेट्रोल पंप चौक ते जॉमेट्रिक सर्कल चौक दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल 17 जुलै ते 31 जुलै या कालावधीत राहणार आहेत.

वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या बदलाबाबत नागरिकांना काही हरकती व सूचना असल्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस उपआयुक्त वाहतूक यांच्याकडे ३० जुलै पर्यंत लेखी स्वरुपात पाठवाव्यात नागरिकांच्या हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.

  • पुढील काळात वाकड ब्रिज ते मेगापोलीस सोसायटी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हिंजवडी मधील वाहतूक सुरळीत, सुरक्षित व विनाअडथळा चालू ठेवण्यासाठी खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

# फेज 2 व फेज 3 कडून येणा-या सर्व प्रकारची अवजड वाहनांनी (आयटी कंपनीच्या सर्व प्रकारच्या बसेस आयटी कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि अन्य आवडज वाहने) टाटा टी जंक्शन येथून डावीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे. यामध्ये पीएमपीएलच्या बसेस ना वगळण्यात आले आहे.

  • # फेज-1 कडून येणारी सर्व प्रकारची अवजड वाहनांनी (आयटी कंपनीच्या सर्व प्रकारच्या बसेस आयटी कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि अन्य आवडज वाहने) जॉमेट्रिक सर्कल येथून डावीकडे वळून टाटा टी जंक्शन येथून उजवीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छितस्थळी जावे. यामध्ये पीएमपीएलच्या बसेस ना वगळण्यात आले आहे.

# वाकड कडून येणा-या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांनी (आयटी कंपनीच्या सर्व प्रकारच्या बसेस आयटी कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि अन्य आवडज वाहने) इंडियन ऑइल चौक येथून उजवीकडे वळून कस्तुरी चौकातून इच्छितस्थळी जावे. यामध्ये पीएमपीएलच्या बसेस ना वगळण्यात आले आहे.

  • # सूर्या अंडरपास येथून येणा-या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांनी (आयटी कंपनीच्या सर्व प्रकारच्या बसेस आयटी कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि अन्य आवडज वाहने) वाकड नाका येथून डावीकडे न वळता सरळ भुमकर चौकातून इच्छितस्थळी जावे. यामध्ये पीएमपीएलच्या बसेस ना वगळण्यात आले आहे.

# कात्रज, कोथरूड, कर्वे नगर, वारजे, बावधन व बाणेर येथून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी (आयटी कंपनीच्या सर्व प्रकारच्या बसेस आयटी कंपनीचे टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि अन्य आवडज वाहने)  मुळा नदी पुलावरून सर्विस रोडला न येता सरळ महामार्गावरून मायकार येथून डावीकडे वळून भूमकर चौकातून इच्छित स्थळी जावे. यामध्ये पीएमपीएलच्या बसेसना वगळण्यात आले आहे.

  • # फेज 1, फेज 2 व फेज 3 कडून शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या चारचाकी हलक्या वाहनांना व तीनचाकी रिक्षांना इंडियन ऑइल चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. या चारचाकी हलकी वाहने व तीन चाकी रिक्षा यांनी शिवाजी चौकातून डावीकडे वळून कस्तुरी चौकातून इच्छित स्थळी जावे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.