BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल गुरुवारी सकाळी सहापासून मतमोजणी संपेपर्यंत असणार आहे.

हिंजवडीमधील वाहतुकीत बदल खालीलप्रमाणे –
# राधा चौक ते म्हाळुंगे गावाकडे जाणा-या रस्त्यावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद
# राधा चौक ते म्हाळुंगे गावाकडे जाणा-या रस्त्यावर सर्व प्रकारच्या पीएमपीएमल बसेस, खाजगी बसेसना प्रवेश बंद
# राधा चौकातून म्हाळुंगे गावात जाण्यासाठी राधा चौक ते म्हाळुंगे पोलीस चौकीच्या मागून इच्छित स्थळी जावे.
# राधा चौकातून म्हाळुंगे गावात जाणा-या कार, मोटारसायकल आणि नागरिकांना महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने हॉटेल हॉलिडे येथून क्रीडा संकुलाच्या मागील बाजूने जाण्याचा देखील मार्ग वापरता येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.