BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक विभागात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी (दि. 11) दुपारी चार वाजल्यापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत राहणार आहेत.

हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनानिमित्त सर्व मंडळे मिरवणूक काढतात. या मिरवणुकी दरम्यान वाहतूक सुरळीत व विना-अडथळा चालू ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून ते मिरवणूका संपेपर्यंत राहणार आहेत.

विसर्जन मिरवणुकी दरम्यान बंद असणारे मार्ग –
# मेझा नाईन हॉटेल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारे सर्व मार्ग बंद
# कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारे सर्व मार्ग बंद
# इंडियन ऑइल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग बंद

पर्यायी मार्ग –
# फेज दोन, फेज तीनकडून येणारी वाहने टी जंक्शन चौक येथे डावीकडे वळून लक्ष्मीचौक विनोदेवस्ती मार्गे इच्छितस्थळी जातील
# फेज दोन, फेज तीनकडून येणारी वाहने व फेज एककडे जाणारी वाहने जॉमेट्रिक सर्कल चौकातून यु टर्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी जातील
# फेज एककडून येणारी वाहने मेझा नाईन चौकातून डावीकडे वळून लक्ष्मीचौक, विनोदेवस्ती या मार्गाने इच्छितस्थळी जातील
# इंडियन ऑइल चौकातून माणगाव फेज एककडे जाणाऱ्या वाहने इंडियन ओईल चौकातून उजवीकडे वळून कस्तुरीचौक, विनोदेवस्ती, लक्ष्मीचौक, टी जंक्शन येथून डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल मधून यु टर्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी जातील.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3