Hinjawadi : विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेजवळ येऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी साडेबारा वाजता वाकड येथे घडली.

दादासाहेब उर्फ औदंबर पांडुरंग शिंदे (रा. काळेवाडी) आणि एक अनोळखी इसम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर वाकड येथे आरोपी फिर्यादी महिलेच्या जवळ आले. आरोपींनी खिशातून पैशांचे पाकीट काढले. ‘किती पैसे पाहिजेत?’ म्हणत महिलेशी गैरवर्तन केले. महिलेचा विनयभंग करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.