Hinjawadi : ओएलएक्सवर स्कुटी विकण्याच्या बहाण्याने तरुणीला 35 हजारांचा गंडा

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवर स्कुटी विकण्याची जाहिरात केली. तरुणीने त्याबाबत चौकशी केली. आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तरुणीकडून 35 हजार रुपये घेतले आणि स्कुटी न देता तिची आर्थिक फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. 12) घडली.
स्मिता कुमारी (वय 24, रा. हिंजवडी) या तरुणीने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
_MPC_DIR_MPU_II
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी स्कुटी विकण्याची जाहिरात ओएलएक्सवर केली. ती जाहिरात पाहून स्मिता यांनी आरोपींना संपर्क केला. आरोपींनी 9350058306, 7027251235 आणि 9772311766 या मोबाईल क्रमांकावरून फोन केले.
आरोपींनी स्मिताला स्कुटी घेण्यासाठी ऑनलाईन 35 हजार रुपये भरण्यास सांगितले. तिने पैसे भरले, मात्र आरोपींनी तिला स्कुटी न देता तिची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.