Hinjawadi : ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाची 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तरुणाकडून 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याला भाड्याने फ्लॅट न देता त्याची फसवणूक केली. असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान घडली.

निशांत जयप्रकाश जोशी (वय 27, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मुरलीधर कांबळे, उदय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत यांना भाड्याने फ्लॅट घ्यायचा आहे. याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी निशांत यांना फ्लॅट भाड्याने देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी ब्रोकरेज आणि सुरक्षा रक्कम म्हणून निशांत यांना 50 हजार रुपये खात्यावर भरण्यास सांगितले. निशांत यांनी पैसे खात्यावर जमा केल्यानंतर देखील आरोपींनी ते पैसे घर मालकाला न देता तिचा अपहार करून निशांत यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.