Hinjawadi : विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाची कार चालकाला अरेरावी

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने रिक्षा आल्याने कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. ब्रेक लावल्यानंतर कारचालकाने कार पुढे नेली. यावरून रिक्षाचालकाने कार चालकाशी हुज्जत घालत त्याला मारहाण केली. ही घटना 29 ऑक्टोबर 2018 रोजी माणरोड, रोहित वडेवाला दुकानासमोर घडली. याबाबत 17 जून 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम नामदेव गडेकर (वय 30 रा मारुंजी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम त्यांची कार घेऊन माण रोडने जात होते. ते रोहित वडेवाले या दुकानासमोर आले असता अचानक विरुद्ध दिशेने एक रिक्षा (एम एच 14 / सीयू 4744) आली. समोरून अचानक रिक्षा आल्याने कारचालकाने कार थांबवली आणि त्यानंतर ते पुढे निघून गेले. यावरून रिक्षाचालकाने तुकाराम यांना थांबवून ‘तुला गाडी चालवता येत नाही का’ असे म्हणून दमबाजी केली. रिक्षाचालकाने तुकाराम यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.