Hinjawadi Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणासह कुटुंबावर गुन्हा

एमपीसी न्यूज : लग्नाचे आमिष (Hinjawadi Crime) दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले व आरोपीच्या आई-वडिलांनीही लग्नाला नकार देत तिच्या जातीवरून तिला हिणवले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुण व त्याच्या आई-वडिलांविरोधात सोमवारी (दि.19) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 22 मे 2022 रोजी घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ऋषिकेश चंद्रकांत इगवे (वय 24 रा.मूळ बीड), त्याचे वडील चंद्रकांत इगवे (वय 50) व आई यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने फिर्यादीला (Hinjawadi Crime) लग्नाचे आमि, दाखवून हिंजवडी इथे तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. तसेच तिचे अक्षेपार्ह्य फोटो काढले. पीडितेनेलग्नाचा तगादा लावला असता आरोपीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार देत हाताने मारहाण करून जीतीवरून हिणवले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Pune Crime : पुण्यात खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.