Hinjawadi : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या सरकारी कर्मचा-यांना अटकाव करणा-या 12 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता पठारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिला, सुषमा उमेश माळी यांची नातेवाईक अनोळखी महिला, लक्ष्मण नामदेव पवार यांची नातेवाईक वयोवृद्ध महिला आणि इतर तीनजणी, विनोद आत्माराम भोसले, सविता वसंत आहेर, व्यंकटेश्‍वर रेड्डी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

  • हेमंत लक्ष्मण नाईकवाडी (वय 52 रा. क्षितीज सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईकवाडी हे मंडल अधिकारी आहेत. सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे तहसीलदारांच्या आदेशानुसार मिळकतींचा ताबा घेण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना विरोध करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आंगज अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.