Hinjawadi : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पतीच्या मित्रावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पती घरात नसल्याचा गैरफायदा घेऊन पतीच्या मित्राने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत पतीच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18) दुपारी म्हाळुंगे येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

थेरगाव येथे राहणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र आहे. आरोपी बुधवारी (दि. 18) दुपारी फिर्यादी महिलेच्या घरी आला. त्याने दाराची कडी वाजवली. फिर्यादी यांनी दार उघडले असता त्यांचे पती कुठे आहेत, असे आरोपीने विचारले. पती कामावर गेले असल्याचे सांगताच आरोपी फिर्यादी महिलेच्या घरात आला. त्याने महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.