Hinjawadi Crime : कारची काच फोडून लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज – कॅफेसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी कारमधून लॅपटॉप चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री दहा ते अकरा या कालावधीत चांदणी चौक, बावधन येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

आफिक अब्बास एसशाम अब्बास (वय 28, रा. विमाननगर, पुणे) यांनी याबाबत रविवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अफिक यांनी त्यांची एम एच 12 / पी झेड 3063 ही कार चांदणी चौक, बावधन येथील सीसीडी कॅफेसमोर लॉक करून पार्क केली होती. रात्री दहा ते अकरा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कारच्या मागील दरवाजाची काच फोडून आतील एक बॅग चोरून नेली. त्यामध्ये 25 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप होता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.