Hinjawadi Crime : गोडाऊनचा पत्रा उचकटून 65 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – गोडाऊनचा पत्रा उचकटून तीन चोरट्यांनी मिळून 65 हजारांचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी म्हाळुंगे येथे उघडकीस आली.

मयूर मनोहर भांदुर्गे (वय 37, रा. बाणेर, पुणे) यांनी याबाबत सोमवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी असिकभाई, नासीर शेख, सलमान रहीस शाहा (सर्व रा. म्हाळुंगे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भांदुर्गे यांचेह म्हाळुंगे येथे ऑर्चीड हॉटेलसमोर गोडाऊन आहे. त्यामध्ये भांदुर्गे यांनी बांधकामाचे साहित्य ठेवले आहे. आरोपी चोरट्यांनी 6 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते 7 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत गोडाऊनचा पत्रा उचकटून गोडाऊन मधून लोखंडी युजॅक 50 नग, बेसप्लेट 40 नग, कैची 50 नग, कप लॉग 50 नग, आणि अन्य साहित्य असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.