Hinjawadi Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून दांपत्यास मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दाम्पत्याला रस्त्यात अडवून सायंकाळी बेदम मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ताजणे वस्ती, पुनावळे येथे घडली.

रेश्मा जुबेर अत्तार (वय 30, रा. जांबे नेरे फाटा, ता. मुळशी) यांनी याबाबत रविवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश कदम, देवा जमादार (दोघे रा. डांगे चौक), असिफ शेख (रा. भुजबळ वस्ती, पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भाजी घेण्यासाठी रिक्षातून जात होते. त्यावेळी आरोपी कारमधून जात होते. फिर्यादी यांना पाहिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला आवाज देऊन थांबण्यास सांगितले. सकाळी झालेल्या वादाच्या कारणावरून तिघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

फिर्यादी यांच्या पतीला लोखंडी रॉड आणि फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.