Hinjawadi Crime : विनोदे वस्ती येथे हॉटेल, वाईन शॉपसह पाच दुकाने फोडली

एमपीसी न्यूज – विनोदे वस्ती, हिंजवडी येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकाने फोडली. यामध्ये हॉटेल, वाईन शॉप, मेडिकल, मोबईल पोपेट शॉप यांचा समावेश आहे.

पाच दुकानांमधून 83 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) रात्री आठ ते बुधवारी (दि. 14) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडला आहे.

विशाल विलास निकम (वय 34, रा. विनोदे वस्ती, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकम यांचे विनोदे वस्ती येथे मोबईल दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा उचकटून चोरट्यांनी फिर्यादी यांचा एक आणि दुरुस्तीसाठी आलेले तीन मोबईल फोन तसेच 29 हजार 200 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.

त्याच रात्री विनोदे वस्ती येथील करपे कॉम्प्लेक्स येथे असलेले आयुष मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन हजार रुपये चोरून नेले.

लक्ष्मी चौकात असलेल्या लक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील प्रिन्स पोपेट शॉप या दुकानाचे देखील शटर उचकटून चोरट्यांनी तीन हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे.

मारुंजी कासारसाई रोडवरील डब्ल्यू स्क्वेअर हॉटेलचा दरवाजा, काच तोडून इन्व्हर्टर, दोन बॅटरी असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला.

बेंगलोर मुंबई महामार्गावर सपन वाईन शॉपचे शटर आणि पत्रा उचकटून दरवाजा तोडला. काच फोडली. वरील सर्व गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी एकूण 83 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.