Hinjawadi Crime : दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याची साखळी पळवली

एमपीसी न्यूज – ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या दोघांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवले आणि दुकानातून 25 हजारांची सोन्याची साखळी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी चार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बावधन येथे घडली.

काळूराम जमालाल वर्मा (वय 41, रा. कृष्णशांती रेसिडेन्सी, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा यांचे हुतात्मा चौक बावधन येथे ज्वेलरी शॉप आहे. रविवारी दुपारी चार ते सव्वा चार वाजताच्या सुमारास दोघेजण ग्राहक म्हणून वर्मा यांच्या दुकानात आले. फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या दुकानातून 25 हजारांची साडेचार ग्राम वजनाची सोन्याची साखळी चोरट्यांनी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.