Hinjawadi Crime : हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांचा छापा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रूट लॉज हॉटेलमधील हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी हुक्का साहित्य जप्त करत एकाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) रात्री करण्यात आली.

दत्ताराम सुनील सावळ (वय 23, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई रवी प्रकाश पवार यांनी गुरुवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या रूट लॉज हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री साडेआठ वाजता पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा मारला. त्यात पोलिसांनी 2 हजार 800 रुपये किमतीचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप, 9 हजार रुपये किमतीचे सहा हुक्का फ्लेवर बॉक्स जप्त केले. एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.