Hinjawadi Crime News : माणमध्ये सुपर मार्केट मधून 10 लाखांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – माण येथे सुपर मार्केट मध्ये 15 ऑगस्ट रोजी दुपारी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्केट दुकान फोडून 10 लाखांची रोख रक्कम चोरून नेली आहे.

तुकाराम सदाशिव पारखी (वय 74, रा. माण) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण मधील भैरवनाथ मंदिराशेजारी फिर्यादी यांचे प्रवीण सुपर मार्केट नावाचे दुकान आहे. 14 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी यांनी त्यांचे किराणा दुकान कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानातील लाकडी कपाटातून 10 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. 15 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.