Hinjawadi Crime News : जमीन विक्रीच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील एका गावात जमीन विकण्याचे असल्याचे सांगून त्यापोटी एका दांपत्याकडून तब्बल 22 लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना जमीन विकत दिली नाही. याबाबत एका व्यावसायिकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जानेवारी 2014 पासून 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीत बाणेर येथे घडला.

काझाक्कुम शब्बर बाबू (वय 39) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. रश्मी मांडा (वय 38, रा. बाणेर, पुणे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या पतीला जमीन खरेदी करायची होती. फ्युचर डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोप्रायटर आरोपी बाबू याने त्यांना सन 2014 मध्ये विश्वासात घेऊन मावळ तालुक्यातील ओवाळे गावातील जमीन दाखवली. त्यातील 16 हजार चौरस फूट जागा फिर्यादी घेणार असल्याचे ठरले. त्यापोटी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात 22 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना जमीन दिली नाही. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.