Hinjawadi : किरकोळ कारणावरून कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पाण्याचा टँकर आडवा लावून कार चालकासोबत भांडण केले. यात टँकर चालकाने लोखंडी पाना कार चालकाच्या डोक्यात मारला. ही घटना हिंजवडी वाकड रोडवर पंचरत्न चौकात मंगळवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.

दामोदर बाळासाहेब कदम (वय 38, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशिकांत गोरख साखरे (वय 32, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शशिकांत याचा पाण्याचा टँकर आहे. फिर्यादी दामोदर त्यांच्या कारमधून हिंजवडी वाकड रोडवरून पंचरत्न चौकातून जात असताना शशिकांत याने त्याचा पाण्याचा टँकर दामोदर यांच्या कारला आडवा लावला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यामध्ये शशिकांत याने टँकरमध्ये ठेवलेला लोखंडी पाना दामोदर यांच्या डोक्यात मारला. यामध्ये दामोदर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मिलन मुरकुटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.