Hinjawadi : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका 13 वर्षीय मुलाने नऊ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. गुरुवारी (दि. 14) सकाळची दहाच्या सुमारास मान परिसरातील एका वस्तीमध्ये हा प्रकार घडला.

या प्रकरणी पीडित बालिकेच्या 42 वर्षीय आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 13 वर्षीय मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 वर्षीय पीडित बालिका घराजवळ खेळत असताना 13 वर्षीय मुलगा तेथे आला. बालिकेला जवळच असणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बालिकेने आईला सांगितला असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक रुपनर पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.