Hinjawadi : दुकानाचे शटर उचकटून चोरी 

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बावधनमधील नाईस मार्ट या दुकानात बुधवारी (ता. 22) सकाळी उघडकीस आली.

जगदीश तुळशीराम चौधरी (वय 36, रा. पार्कवेज सोसायटी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे बावधनमध्ये दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिस उपनिरीक्षक वरुडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.