Hinjawadi Crime News: मोलकरणीने पळवली 65 हजारांची अंगठी

एमपीसी न्यूज – घरातील पलंगावर ठेवलेली 65 हजारांची सोन्याची अंगठी मोलकरणीने चोरून नेली. ही घटना बावधन येथे 23 ऑक्‍टोबर रोजी घडली.

अंजली पाठक (रा. भूगाव, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. अंशु राजेंद्रसिंह सिसोदिया (वय 32, रा. स्टारगेज सोसायटी, बावधन) यांनी शुक्रवारी (दि. 13) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली पाठक ही फिर्यादी अंशु यांच्या घरी मालकरीण म्हणून काम करते. 23 ऑक्‍टोबर रोजी फिर्यादी यांनी आपल्या हातातील 65 हजार रुपये किंमतीची अंगठी पलंगावर ठेवली होती. त्या दिवशी सकाळी सव्वा सात ते नऊ वाजताच्या दरम्यान घरकाम करण्यासाठी आलेल्या अंजली पाठक हिने ती अंगठी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.