Hinjawadi Crime News : माण येथे शेतात आढळले सहा फुटांचे गांजाचे झाड; एकाला अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडीजवळ माण येथे एका शेतात सहा फूट उंचीचे पावणे तीन किलो वजनाचे गांजाचे झाड सापडले. याबाबत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शेखर गोपाळ गुंजाळ (वय 55, रा. कोथरूड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अजित लिम्बराज कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-हिंजवडी रस्त्यावर सुरेश बोडके यांच्या शेतात गांजाचे झाड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि. 10) शेतात जाऊन पाहणी केली असता शेतामध्ये सहा फूट तीन इंच उंचीचे दोन किलो 810 ग्रॅम वजनाचे गांजाचे झाड आढळून आले.

पोलिसांनी हे 70 हजार 250 रुपये किमतीचे झाड हस्तगत केले. सुरेश बोडके यांच्या मालकीची ही शेतजमीन असून सध्या ती आरोपी शेखर गुंजाळ याच्या ताब्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी शेखर गुंजाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.