Hinjawadi Crime News : रस्ता ओलांडणाऱ्या 80 वर्षीय वृद्धाचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – बालेवाडी स्टेडियमजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या एका 80 वृद्धाला भरधाव कारने जोरात धडक दिली. त्यात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 23) सायंकाळी सव्वापाच वाजता घडली.

पंढरीनाथ कसाळे (वय 80, रा. सुतारवाडी, माणगाव, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मिलिंद पंढरीनाथ कसाळे (वय 42) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 13 / एच क्यू 1535 या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पंढरीनाथ कसाळे बालेवाडी स्टेडियम जवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगात आलेल्या एका कारने जोरात धडक दिली.

त्यात पंढरीनाथ यांच्या डोक्याला, कमरेला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.