Hinjawadi Crime News : अंगावर गाडी घालून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जनासाठी जाणाऱ्या घोळक्यात चारचाकी गाडी घालून एका व्यक्तीला जखमी केले. याप्रकरणी गाडी चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ढमाले वस्ती, नेरे दत्तवाडी येथे घडली.

भैरवनाथ जगन्नाथ पुजारी (वय 36, रा. ढमालेवस्ती, नेरे दत्तवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांनी सोमवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल मारुती जाधव (रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे शेजारील लोक रविवारी रात्री गणेश विसर्जनासाठी जात होते. त्यावेळी आरोपी बोलेरो गाडी घेऊन भरधाव वेगात आला. आरोपीची गाडी भरधाव वेगात येत असल्याचे पाहून सर्व लोक आजूबाजूला पळाले. फिर्यादी देखील पळत असताना आरोपीने फिर्यादी यांच्या अंगावर गाडी घातली. त्यात फिर्यादी यांच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान फिर्यादी यांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर आरोपीने गाडीतून उतरून कोयता हातात घेऊन ‘मी इथला भाई आहे. मी काय चीज आहे ते तुम्हाला आता दाखवतोच’ असे म्हणत शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.