Hinjawadi Crime News : भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ‘मुत्तुट फायनन्स’ कंपनीत दरोड्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पिस्तूलाच्या धाक दाखवून चौघांनी मिळून सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या कंपनीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी अडीचच्या सुमारास ‘मुत्तुट फिनकॉर्प गोल्डलोन’ कंपनीच्या हिंजवडी शाखेत घडली.

संस्कृती रविभूषण शरण (वय 26, रा. जिंजर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिल्या माहितीनुसार, फिर्यादी संस्कृती या शाखा व्यवस्थापक आहेत. सोमवारी दुपारी त्या नेहमीप्रमाणे काम करीत असताना एक अनोळखी तरुण गोल्ड लोनची चौकशी करण्यासाठी त्यांच्या शाखेत आला. त्यानंतर पुन्हा बाहेर जाऊन काही वेळाने आणखी तीन साथीदारांना घेऊन तो जबरदस्ती शाखेत घुसला.

आरोपींनी स्टाफला पिस्तूलाचा धाक दाखवून सोने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली. मात्र, त्यावेळी एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून वेळीच सायरन सुरू केला. सायरनचा आवाज ऐकून आरोपींनी पळ काढला.

घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपी एका सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले आहेत. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या प्रकरामुळे शहरात एकाच खळबळ उडाली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.