Hinjawadi Crime News : महामार्गावरील लोखंडी खांब चोरण्याचा प्रयत्न; दोन महिलांसह तिघांना अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मुंबई -बंगळुरू महामार्गावर जुना जकात नाका वाकड येथे तिघांनी रस्त्यावरील लोखंडी पोल चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी घडली.

दीपक पांडुरंग इंगळे (वय 25), वैशाली नागनाथ चंदनशिवे (वय 39), शीला संजय गायकवाड (वय 35, तिघे रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत ओमकार विठ्ठल सुदेवाड (वय 22 रा. वरवे खुर्द ता. भोर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबई -बंगळुरू महामार्गावर वाकड ब्रिज जवळ, जुन्या जकात नाक्यासमोर असलेल्या अंडरपास येथे रिक्षातून आले. त्यांनी महामार्गावरील लोखंडी पूल चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.