Hinjawadi crime News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला मारहाण; गर्भपात झाल्यानंतर केला अनैसर्गिक अत्याचार

एमपीसी न्यूज – सासरी नांदत असलेल्या विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी क्रूर वागणूक देऊन तिचा छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. त्यात तिचा गर्भपात झाला. गर्भपात झाल्यानंतर तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद आणि नंदावा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 19 फेब्रुवारी 2015 पासून 19 जानेवारी 2021 या कालावधीत मोहननगर, बाणेर येथे घडला. विवाहिता सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिला क्रूर वागणूक देऊन तिचा छळ केला. पैसे आणावेत यासाठी वारंवार घटस्फोट देण्याची धमकी दिली.

विवाहितेच्या नंदाव्याने तिच्याशी गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. सासू सास-यांनी देखील तिच्याशी गैरवर्तन करत तिला स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिने लग्न झाल्यापासून तिला दिले नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

विवाहिता गरोदर असताना आरोपींनी तिचा छळ करून पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात लाथा मारून गर्भपात केला. त्यानंतर विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत सासरच्या पाच जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 313, 377, 354, 406, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like