Hinjawadi Crime News : पाण्याच्या टाकीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – चाळीतील पाण्याच्या टाकीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 16) दुपारी साडेचार वाजता वाघदरी वस्ती, हिंजवडी येथील निलेश जांभूळकर यांच्या चाळीत घडली.

कुणाल फताराम पवार, सुरज फताराम पवार, सोनू संभाजी रणदिवे (तिघे रा. निलेश जांभूळकर यांची चाळ, वाघदरी वस्ती, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष नाजुकराव वानखेडे (वय 30, रा. निलेश जांभूळकर यांची चाळ, वाघदरी वस्ती, हिंजवडी. मूळ रा. अकोला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे राहत असलेल्या निलेश जांभूळकर यांच्या चाळीतील पाण्याच्या टाकीवर शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेले होते.

त्यावेळी टाकीजवळ उभा असलेल्या आरोपी कुणाल आणि सुरज यांनी विनाकारक फिर्यादी यांना चिडवले. त्यावर ‘तुम्ही मला वारंवार का चिडवत शिवीगाळ करता’ असे वानखेडे यांनी आरोपींना विचारले.

यावरून आरोपी कुणाल याने काठीने वानखेडे यांना मारहाण केली. ही भांडणे पाहून आरोपी सोनू तिथे आला. आरोपी सुरज आणि सोनू यांनी वानखेडे यांना शिवीगाळ केली. सुरज यानेही वानखेडे यांना काठीने मारहाण केली.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.