Hinjawadi Crime News : पूर्ववैमनस्यातून बिगारी कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला वायरने मारहाण करण्यात आली. ही घटना म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. 11) सकाळी घडली.

पप्पू हरजन (सध्या रा. सुनील नगर, म्हाळुंगे गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश तेजय्या यादव (वय 40, रा. सूसगाव, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्या भावाचे आणि फिर्यादी यांच्या पत्नीचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. शनिवारी सकाळी फिर्यादी म्हाळुंगे येथील एका इलेक्ट्रिकल कंपनीत कामासाठी गेले.

मागे झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी पप्पू हरजन याने इलेक्‍ट्रीक केबल वायरने फिर्यादी यांना कंपनीच्या गेटवर आणि गोडाऊन येथे वायरने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.