Hinjawadi Crime News : वाहनांच्या काचा फोडून रोकड, लॅपटॉप, कागदपत्रे लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून एक लाख 90 हजारांची रोकड, तीन लॅपटॉप, बॅगा व त्यातील वस्तू तसेच कागदपत्रे चोरून नेले. ही घटना पिनॅकल सोसायटीसमोर सार्वजनिक रस्त्यावर बावधन येथे सोमवारी (दि. 9) सायंकाळी सव्वापाच ते साडेसातच्या दरम्यान घडली.

प्रदीप एकनाथ कांबळे (वय 33, रा. निंबाळकर नगर, कोल्हापूर) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या दोन चारचाकी वाहनांच्या डाव्या बाजूच्या मागील काचा फोडून नुकसान केले. तसेच एक लाख 90 हजाराची रोकड, तीन लॅपटॉप व त्यातील वस्तू तसेच कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.