Hinjawadi Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला उपाशीपोटी ठेवले. याबाबत पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हाजीमलंग मेहबूब शेख (वय 28), रमजानबी मेहबूब शेख (वय 52, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला. आरोपींनी पीडित विवाहितेला उपाशीपोटी ठेवले. वारंवार तिला मारहाण व शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.