Hinjawadi Crime News : एटीएम कार्ड क्लोन करून दोघांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एटीएम कार्डचे क्लोनिंग करून एका महिलेची 38 हजारांची, तर एका व्यक्तीची 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला.

याबाबत गुरुवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चित्रा मोहन (वय 48, रा. हिंजवडी फेज तीन, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चित्रा यांच्या इंडियन बँकेच्या खात्यातून अज्ञातांनी त्यांच्या डेबिट कार्डचे क्लीनिंग करून 38 हजार रुपये काढून घेतले. याबाबत फसवणुकीची तक्रार देण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात आल्या होत्या.

त्यावेळी महेश शामसुंदर शर्मा (वय 33) यांच्या देखील एटीएम कार्डचे क्लोनिंग करून स्टेट बँकेच्या खात्यातून 30 हजार रुपये काढले असल्याचा प्रकार निदर्शनास आला. दोन्ही घटनांबाबत चित्रा यांनी फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.