Hinjawadi crime news: महिलेचा दुचाकीवरुन पाठलाग करणाऱ्या दोघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज – घराबाहेर अर्धनग्न उभा राहून महिलेचा विनयभंग केला. तसेच दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आणि 25 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजता हिंजवडी आणि माणगाव येथे घडला.

गजानन सुभाष तडसे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह उमेश सुभाष तडसे (दोघे रा. भोईरवाडी, माण, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपी गजानन याने घराबाहेर अर्धनग्न अवस्थेत उभा राहून महिलेचा विनयभंग केला. याबाबत विचारणा करण्यासाठी महिलेचे आई-वडील गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे एक वाजता हिंजवडी येथील टीसीएस कंपनीच्या गेट समोरून जात असताना आरोपी गजानन आणि उमेश यांनी दुचाकीवरून पीडित महिलेचा पाठलाग केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन केले. पोलिसांनी गजानन याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.