Hinjawadi Crime News : सराईत गुन्हेगाराला पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज – दरोडा आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली.

प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, रा. पिरंगुट, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील गुन्हेगार बाळ्या पवार हा लातूर येथील गुन्ह्यात फरार असून तो बावधन येथे थांबला आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

आरोपी बाळ्या याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार 400 रुपये किमतीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी त्याच्याकडून 40 हजार 200 रुपये किमतीचे आणखी एक पिस्टल आणि काडतूस जप्त केले आहे.

आरोपी बाळ्या हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात दरोड्याचे दोन, अग्निशस्त्र बाळगल्याचा एक असे गुन्हे दाखल आहेत. तो लातूर ग्रामीण पोलीस ठाणे येथील खुनाचा प्रयत्न आणि जामखेड पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात सात महिन्यांपासून फरार आहे.

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधावणे, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, संदीप पाटील, शैलेश मगर, किरण काटकर, सुधीर डोळस, अशोक गारगोटे, निशांत काळे, गणेश गिरीगोसावी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.