Hinjawadi Crime News : सुस खिंडीत शस्त्राचा धाक दाखवून वाहन चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – पुणे-बेंगलोर महामार्गावर सुस खिंडीजवळ पाषाण सुतारवाडी येथे दोन चोरट्यांनी एका वाहन चालकाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री दोन वाजता घडली.

ओमकार भरत गालफाडे (वय 24, रा. बोराटेवस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. ते गुरुवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावरून टेम्पोमध्ये भाजीपाला घेऊन जात होते. पाषाण सुतारवाडी येथे सुस खिंडीजवळ एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ओमकार यांना कोयत्याचा धाक दाखवून थांबवले.

ओमकार यांच्याकडील आयफोन कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण दोन हजार 600 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर चोरटे वाकडच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.