Hinjawadi Crime News : एक कोटींच्या अपहारप्रकरणी आठजणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ग्राहकांचे आलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरून एक कोटी 1 लाख 29 हजार 440 रुपयांचा अपहार करण्यात आला. या प्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथील ‘सुमन कीर्ती कार’ या शोरुममध्ये उघडकीस आला आहे.

विजयकुमार गोवर्धन कादे (वय 39, रा. शिवपार्वती नगर, पंढरपूर) यांनी याबाबत सोमवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मॅनेजर योगेश आरुलकर, प्रसाद भादुले, भानूप्रसाद गड्डे, टेलीकॉलर कल्पना बिक्कड, हितेश कुचेरिया, कॅशियर सोनाली ढगे, मंदाकिनी रेडकर, राजरतन भिसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ‘पॉलिसी’ आणि वर्कशॉपमधील बिलापोटी जमा झालेले एक कोटी १ लाख २९ हजार ४४० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. याबाबत माहिती मिळताच फिर्यादी कादे यांनी हिंजवडी पोलिस ठाणे येथे तक्रारी अर्ज केला. या अर्जावरून सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.